नव्या संसद भवनाच्या छतावरून पाणी गळती

Photo of author

By Sandhya

‘नव्या संसद भवनाच्या छतावरून पाणी गळती’

नवी दिल्लीमध्ये बुधवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. या पावसामुळे नवीन बांधण्यात आलेली संसद भवन पाण्यात गेल्याचे पाहायला मिळाले.

संसदेच्या मकरद्वारजवळही पाणी साचले आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अशात आता नवीन संसद भवनाच्या आतही पाणी गळत असल्याचे व्हिडिओ इंडिया आघाडीच्या नेत्यांनी शेअर केले आहे.

तामिळनाडूच्या विरुधुनगर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी पोस्ट केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये संसदेच्या नवीन इमारतीत पाणी शिरताना दिसत आहे. छतावरून पाणी गळत असून, पडणारे पाणी पसरू नये म्हणून फरशीवर बादल्या ठेवण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

‘पेपर लीकेज आउटसाइड, वॉटर लीकेज इनसाइड…’ “बाहेरून कागदाची गळती, आतमध्ये पाणी गळती. राष्ट्रपतींनी वापरलेल्या संसदेच्या लॉबीमध्ये अलीकडेच झालेली पाण्याची गळती, नवीन इमारतीतील हवामानाशी संबंधित समस्यांवर प्रकाश टाकते,

जी अजून बांधायची आहे,” असे काँग्रेस नेत्याने सोशल मीडियावर लिहिले. या विषयावर लोकसभेत स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला. काँग्रेस नेत्याने हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स यावर  कमेंट करत आहे.

समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहत टीका केली आहे, ‘या नव्या संसदेपेक्षा जुनी संसद चांगली होती, जिथे जुने खासदारही येऊन भेटू शकत होते.

किमान जुनी संसद पुन्हा चालू का देऊ नये? -कोट्यवधी रुपयांच्या निधीतून उभारलेल्या संसदेत पाणी गळतीचा कार्यक्रम सुरू आहे तोपर्यंत जुन्या  संसद भवनात कामकाज सुरु ठेवावे.  

जनता विचारत आहे की भाजप सरकारच्या काळात बांधलेल्या प्रत्येक नवीन छतावरून पाणी टपकणे हा त्यांच्या विचारपूर्वक केलेल्या रचनेचा भाग आहे का असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

दिल्लीत बुधवारी सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस रात्रभर सुरूच होता, त्यानंतर सरिता विहार, दर्यागंज, प्रगती मैदान आणि आयटीओसह दिल्लीतील अनेक भाग पाण्यामुळे पूर आला.

आज गुरुवारी सकाळपासूनच रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहने रेंगाळताना दिसत होती. पावसामुळे बिघडलेल्या परिस्थितीमुळे दिल्लीत आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या काळात काही महाविद्यालयेही बंद राहणार आहेत.

Leave a Comment