BREAKING NEWS : निमंत्रण पत्रिकेत शिवसेना खासदाराचे नाव नसल्याने मुख्यमंत्र्यांनी थेट दौराच केला रद्द?

Photo of author

By Sandhya

निमंत्रण पत्रिकेत शिवसेना खासदाराचे नाव नसल्याने मुख्यमंत्र्यांनी थेट दौराच केला रद्द?

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रम पत्रिकेत शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांचे नाव जाणीवपूर्वक टाळण्यात आल्यामुळे शिवसैनिकांत प्रचंड चिड निर्माण झाली होती. याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर यांनी हा प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून देताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहूरी कृषी विद्यापीठ येथील मंगळवारचा नियोजित दौरा अखेर रद्द केला आहे.

या निर्णयामुळे शिवसैनिकांनी जल्लोष केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मंगळवार (दि.२५) रोजी राहूरी (जि.अहमदनगर) कृषी विद्यापीठ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र शिर्डी लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांचे निमंत्रण पत्रिकेवर नाव टाकण्यात आलेले नव्हते, त्यामुळे येथील कुलगुरुंचा शिवसैनिकांनी जाहिर निषेद्ध व्यक्त केला होता.

शिवसेनेचे मुख्यमंत्री कार्यक्रमाला येत असतांना शिवसेनेच्या खासदारांचे नांव निमंत्रण पत्रिकेत न टाकण्यामागचे कारण काय ? कुलगुरु हे राजकारण करतात का ? असे एक ना अनेक प्रश्न जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांतून उपस्थित केले जात होते.

याबाबत शिवसेनेचे उत्तरनगर जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर यांनी खरी वस्तुस्थिती मुख्यमंत्री शिंदे यांच्या कानावर घालताच मुख्यमंत्र्यांनी आजचा नियोजित कार्यक्रम दौरा अखेर रद्द करुन राहूरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु यांना याबाबत विचारणा केली, यापुढे नियमानुसार शिवसेनेचे लोकप्रतिनिधी व शिवसेना पदाधिकारी यांना विश्वासात घेवूनच कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्याची तंबी दिली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी नियोजित दौरा रद्द करुन शिवसैनिकांच्या आव्हानाला प्रतिसाद घेत अधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार यावेळी घेतला.

राज्याचे मुख्यमंत्र्यांनी नियोजित कार्यक्रमात आपल्या लोकप्रतिनिधीचे नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्यामुळे आपला दौरा अखेर रद्द केल्यामुळे जिल्हाप्रमुख राजेंद्र पाटील देवकर, कमलाकर पाटील कोते, युवासेना जिल्हाप्रमुख शुभम वाघ, उपजिल्हाप्रमुख जयंतराव पवार, अण्णासाहेब म्हसे, राहुरी तालुकाप्रमुख देवेंद्र लांबे, सुनिल कराळे, विक्रम फाटे, संपतराव जाधव, किशोर मोरे, अशोकराव तनपुरे, गंगाधर सागळे, संगम रसाळ, संदीप दातीर, संतोष डहाळ, बापूसाहेब शेरकर, लक्ष्मण पाचपिंड, शिवनाथ फोफसे, आदीसह शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांचे अभार मानले.

तसेच मुख्यमंत्री शिवसैनिक व शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींच्या मागे ठामपणे उभे राहिल्यामुळे  जिल्ह्यातील शिवसैनिकांतून कौतुक केले जात आहे.

Leave a Comment