निरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व; सोमेश्वर सहकार विकास पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी; विरोधकांचा धुव्वा

Photo of author

By Sandhya

सासवड येथे निरा बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचा जल्लोष.. सोबत आमदार संजय जगताप व मान्यवर

सासवड :-
पुरंदर तालुका आणि बारामती तालुक्यातील ४२ गावांचा समावेश असणाऱ्या निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आणि पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखालील महाविकास आघाडी पुरस्कृत सोमेश्वर सहकार विकास पॅनलने १६ जागांवर मताधिक्य मिळवून माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या शिवसेना-भाजप पुरस्कृत जय मल्हार शेतकरी पॅनेलच्या उमेदवारांचा धुव्वा उडविला. १८ जागांपैकी सोमेश्वर सहकार विकास पॅनेलच्या २ जागा याआधीच बिनविरोध झाल्या होत्या. १६ जागांसाठी मतदान झाले होते.


शुक्रवारी एकूण ३१३८ मतदारांपैकी २९७१ मतदारांनी मतदान केले. विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आणि पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी पुरस्कृत सोमेश्वर सहकार विकास पॅनेल विरूध्द माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, भाजपचे जालिंदर कामठे, पुरंदर अध्यक्ष गंगाराम जगदाळे यांच्या नेतृत्वाखालील भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि आरपीआय पुरस्कृत जय मल्हार स्वाभिमानी शेतकरी पॅनेल अशी सरळ लढत या निवडणुकीत झाली होती. यामध्ये शिवतारेंच्या पॅनेलचा सुपडा साफ झाला.


निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड येथील उपबाजार आवारातील दादा जाधवराव सांस्कृतिक भवनात शनिवारी ( दि २९ ) सकाळी ९ वा निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पुरंदर श्रीकांत श्रीखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीस सुरूवात झाली. यामध्ये सर्वप्रथम हमाल मतदार संघातून सोमेश्वर सहकार पॅनेलच्या विक्रम पांडूरंग दगडे यांनी विरोधी जयमल्हार पॅनेलच्या नितीन लालासो दगडे यांचा मतांनी ४७ मतांनी पराभव केला. विक्रम दगडेंना ८२ तर दगडेंना ३५ मते मिळाली. सोसायटी मतदार संघात सर्व ११ जागांवर सोमेश्वर सहकार पॅनेलने धुव्वा उडवित एकहाती विजय संपादन केला. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत श्रीखंडे यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत सोमेश्वर सहकार पॅनेलचे १८ उमेदवार विजयी झाल्याचे जाहीर केले.

सासवड येथे निरा बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचा जल्लोष.. सोबत आमदार संजय जगताप व मान्यवर

महाविकास आघाडी पुरस्कृत सोमेश्वर सहकार विकास पॅनेलचे विजयी उमेदवार, मिळालेली मत, गावाचे नाव पुढीलप्रमाणे :- सोसायटी मतदार संघ सर्वसाधारण ७ जागा – संदीप सुधाकर फडतरे ( १२८६) बोपगाव, अशोक आबासो निगडे ( १३२४) कर्नलवाडी, देविदास संभाजी कामठे ( १३५५ ) कुंभारवळण, शरद नारायणराव जगताप ( १३२८ ) माहूर, पंकज रामचंद्र निलाखे ( १२९३ ) होळ, बाळासाहेब गुलाब जगदाळे ( १३४१) मुर्टी, वामनभाऊ अश्रू कामठे ( १३४३) चांबळी.

इतर मागास प्रवर्ग १ जागा – महादेव लक्ष्मण टिळेकरय एखतपुर ( १५०९ ) मुंजवडी.

महिला प्रतिनिधी २ जागा- शहाजान रफिक शेख ( १३६५) माळशिरस, शरयू देवेंद्र वाबळे ( १४०९ ) मुढाळे.

भटक्या विमुक्त जाती – जमाती १ जागा – भाऊसाहेब गुलदगड ( १४२४ ) पळशी.

ग्रामपंचायत सर्वसाधारण २ जागा- गणेश दत्तात्रय होले ( ५७३ ) निळूंज, बाळू सोमा शिंदे ( ५५५ ) करंजे.

अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ १ जागा- सुशांत राजेंद्र कांबळे ( ५५८ ) रिसे.

आर्थिक दुर्बल घटक १ जागा – मनिषा देविदास नाझीरकर ( ५३५ ) नाझरे क प.

व्यापारी अडते मतदार संघ २ जागा बिनविरोध – अनिल बबन माने ( सासवड ) आणि राजकुमार जयकुमार शहा ( निरा )

हमाल व तोलारी मतदारसंघ १ जागा – विक्रम पांडुरंग दगडे ( ) निरा.

निकालानंतर झालेल्या विजयी सभेत उमेदवारांसह आमदार संजय जगताप, सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, सुदामराव इंगळे, जि प सदस्य दत्ता झुरंगे, प्रचार प्रमुख नंदकुमार जगताप, बबूसाहेब माहूरकर, संभाजीराव झेंडे, माणिकराव झेंडे पाटील, प्रदीप पोमण, विठ्ठलराव मोकाशी, माऊली यादव, सुनिता कोलते, संभाजी काळाणे, गौरी कुंजीर, बाळासाहेब कामथे, अनिल उरवणे, बापू भोर, पुष्कराज जाधव, लालासो नलावडे, अनिल उरवणे, गणेश जगताप, तुषार माहूरकर, राजेंद्र धुमाळ, योगेश फडतरे, एकनाथ यादव, बाजीराव कुंजीर आदी उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय

कृषी उत्पन्न बाजार समिती निरा च्या पंचवार्षिक निवडणुकीत नेते अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या एकजुटीची वज्रमूठ आणि मतदारांचा विश्वास याचा विजय झाला आहे. यानिमित्त मतदारांनी बोलघेवड्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. यापुढील काळातही महाविकास आघाडीची वज्रमूठ अशीच राहिल. अपेक्षित निकाल लागला असून किहींनी पैशांचा वापर केला मात्र मतदारांनी त्यांना नकार देत महाविकास आघाडीच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतला. मागील पंचवार्षिक निवडणुकीत आघाडीच्या कामाची पावती यानिमित्त मतदारांनी दिली. सर्व विजयी उमेदवार आणि मतदारांचे आभार. आमदार संजय जगताप

Leave a Comment

You cannot copy content of this page