राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करताना स्टेनलेस स्टीलचा वापर झाला असता तर तो पुतळा कोसळा नसता, असे स्पष्ट मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलेय. समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात कोणतेही बांधकाम करताना त्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर होणे गरजेचे आहे.
कारण त्याला गंज लागत नाही, असे स्पष्टीकरणही नितीन गडकरी यांनी यावर दिलेय. मंगळवारी ते दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. गडकरी यांच्या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. छत्रपतीचा पुतळा तयार करताना तज्ञ्जांचा सल्ला घेतला होता का? असा सवाल उपस्थित झालाय.
राजकोट पुतळा दुर्घटनेवरुन जुंपली, मविआ-भाजप आज आमनेसामने, राज्यभरात आंदोलन! मालवण येथील राजटोक किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापलेय.
विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. याप्रकरणी करावाई करत शिल्पकार जयदीप आपटे यांच्यासह अनेकांना गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत. याप्रकरणात भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत असतानाच नितीन गडकरींच्या वक्तव्य चर्चेत आले आहे.
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तयार करताना स्टेनलेस स्टील वापरलं असते तर पुतळा कोसळला नसता, असे गडकरी यांनी म्हटले आहे. समुद्र किनाऱ्याच्या परिसरात कोणतेही बांधकाम करताना स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात यावा.
समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात यावा, यासाठी मी गेल्या तीन वर्षापासून सातत्याने प्रयत्न करत आहे, असेही गडकरींनी सांगितले. समुद्रकिनारी उभारण्यात येणाऱ्या कोणत्याही स्ट्रक्चरवर लोखंडाऐवजी स्टेनलेस स्टीलचा वापर करावा, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे.