पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू

Photo of author

By Sandhya


पुरंदर : तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर महामार्गावर एसटी बस आणि मोटरसायकल यांचा भीषण अपघात होऊन यामध्ये एक जण मृत्युमुखी पडला आहे. पुरंदर तालुक्यातील. ढुमेवाडी येथे हा अपघात घडला आहे यामध्ये 67 वर्षीय विजय कोंढाळकर यांचा मृत्यू झाला आहे.. आज सकाळी बारा वाजले का दरम्यान हा अपघात झाला. कोंढाळकर हे मोटरसायकल वरून आपल्या घराकडे निघाले असताना पुण्याकडून आलेल्या एसटी बस क्रमांक एम एच 14 के क्यू 5041 या मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या बसची जोरदार धडक बसली यामध्ये कोंढाळकर हे गंभीर रित्या जखमी झाले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.. याबाबत सासवड पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.. पृथ्वीराज अशोक ढुमे यांनी याबाबतची फिर्याद सासवड पोलिसात दिली असून या संदर्भातील अधिकचा तपास सासवड पोलीस करत आहेत.

Leave a Comment