Opposition aggressive on the steps of Vidhan Bhavan


नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी
फाईल चालते पैशाने म्हणत सरकारचा निषेध.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आज विधानभवनाचा परिसर घोषणाबाजीने दणाणून गेला. मंत्रालयातील कथित भ्रष्टाचार आणि ‘लक्ष्मी दर्शनाच्या आरोपावरून विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले.
’फाईल चालते पैशाने’ अशा घोषणा देत विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. यावेळी आंदोलकांनी प्रामुख्याने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना लक्ष्य केले. मंत्रालयात लक्ष्मी दर्शन, झिरवळ राजीनामा द्या”, राजीनामा घ्या, राजीनामा घ्या, नरहरी झिरवळ राजीनामा घ्या अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. सरकार भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारचा निषेध केला.
आंदोलनादरम्यान सरकारमध्ये एकच हिरवळ, त्याचं नाव झिरवळ झिरवळ अशा खोचक घोषणाही देण्यात आल्या. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून संकट मोचकांचा राजीनामा घेण्याची मागणी करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या आंदोलनामुळे अधिवेशनाच्या कामकाजात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठ्या संघर्षाची चिन्हे दिसत आहेत.