पंकजा मुंडेंचा सुट्टी घेण्याचा निर्णय; फडणवीसांची प्रतिकीर्या जाणून घ्या…

Photo of author

By Sandhya

पंकजा मुंडेंचा सुट्टी घेण्याचा निर्णय; फडणवीसांची प्रतिकीर्या जाणून घ्या…

भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ठणकावून सांगितले. पंकजा मुंडे आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. त्या सातत्याने पक्षाचे काम करत असून, यापुढेही त्या करत राहतील, असे ते म्हणाले.

पंकजा मुंडे यांनी आपण सध्याच्या राजकारणाला कंटाळून 2 महिने राजकारणापासून अलिप्त राहणार असल्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे त्या पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. अशात फडणवीसांनी पत्रकांराशी संवाद साधत याबाबतच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली.

फडणवीस पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आमच्यासोबत आला आहे. आमचे बरेच जण त्यांच्याविरोधात निवडणूक लढवत होते. त्यामुळे, राष्ट्रवादी आमच्यासोबत आल्यानंतर काही जणांची नाराजी स्वाभाविक आहे. प्रत्येकाला हे लगेच मान्य होईल असे ना आम्ही म्हणतोय ना राष्ट्रवादीचे लोक समजत आहे.

मात्र, प्रत्येक गोष्टीचा चर्चेतून मार्ग निघत असतो, या ही गोष्टीचा मार्ग चर्चेतून निघेल. पंकजा मुंडे या दोन महिने सुटी घेणार आहेत असे समजले, त्या आमच्या राष्ट्रीय सचिव आहेत, त्यांच्याशी राष्ट्रीय नेते चर्चा करतील. आम्ही त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेणार आहोत. भाजपचे अनेक नेते थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात मैदानात उतरल्याचे यापूर्वी दिसून आले आहे.

तर परळीतून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असलेले त्यांचे भाऊ धनंजय मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवली आहे. आता धनंजय मुंडे सोबत आल्याने या मतदारसंघात कोण निवडणूक लढवणार भाजप मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडणार का असा सवाल उपस्थित होत असल्याने पंकजा मुंडे यांच्या भोवती राजकारण फिरताना दिसून येत आहे.

Leave a Comment