BIG NEWS : पंतप्रधान मोदी यांना फिजी देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

Photo of author

By Sandhya

पंतप्रधान मोदी यांना फिजी देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिजी देशाचा ‘कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. जपानमधील जी ७ आणि क्वाड बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (दि.२१) पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले.

तेथे त्यांनी फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक आयलँड्स को-ऑपरेशन (FIPIC) च्या तिसऱ्या शिखर परिषदेला हजेरी लावली. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी पॅसिफिक क्षेत्रातील अनेक देशांच्या नेत्यांची भेट घेऊन मैत्रीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे.

जागतिक नेता म्हणून भारताच्या या पावलांसाठी, फिजीच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या देशाचा सर्वोच्च सन्मान प्रदान केला.

Leave a Comment

You cannot copy content of this page