पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त १ ऑगस्ट रोजी पुण्यातील वाहतुकीत बदल

Photo of author

By Sandhya

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी(१ ऑगस्ट) पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल मार्गिकेचे लोकार्पण होणार आहे. या वेळी सकाळी दहा ते दुपारी अडीच या वेळेत पंतप्रधान मोदी हे पुण्यात असणार आहेत.

तसेच पुणे शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम 1 ऑगस्ट रोजी शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आयोजित केला असल्याने त्याअनुषंगाने आवश्यक ते वाहतूक बदल करण्यात येणार असल्याचे पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

शहरात मंगळवारी (1 ऑगस्ट) सकाळी 6 वा. ते दुपारी 3 वा. दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात आवश्यकतेप्रमाणे पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक,

सेवासदन चौक, अलका चौक, टिळक रोड, जेधे चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, संगमवाडी रोड, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रोड आदी ठिकाणांवरील वाहतूकीत बदल करण्यात येतील.

वाहनचालकांनी त्यांची गैरसोय होवू नये याकरीता या मार्गांचा वापर टाळून अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहनही वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Comment