सोशल मीडियातून चुकीचे व्हिडिओ पाठवून देशामध्ये सामाजिक तणाव निर्माण करण्याचे काम विरोधकांकडून होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून येत्या महिनाभरात देशामध्ये मोठ्या समाजविघातक घटना घडविण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कऱ्हाड येथील सभेत केला.
सोशल मीडियावरील फेक व्हिडिओ पुढे पाठविण्यापूर्वी विचार करा, कायदे कडक आहेत, तुमचेही नुकसान होऊ शकते, अशा व्हिडिओंबाबत पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कऱ्हाड येथे आज मोदींची सभा झाली. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,
पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी आमदार मदन भोसले, माथाडी नेते नरेंद्र पाटील, डॉ. अतुल भोसले आदी उपस्थित होते.
महिनाभरात देशात मोठे कांड पंतप्रधान म्हणाले, ‘‘एकविसावे शतक तंत्रज्ञानाचे युग आहे. त्याचा मीही समर्थक आहे. मी लोकांशी जोडण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतो; परंतु आत्ता फार चिंताजनक प्रकार सुरू आहेत. जे सरकारशी मुद्द्यांवर, खरेपणाने त्यांनी केलेल्या कामाच्या आधारावर लढू शकत नाहीत, ते सोशल मीडियावर फेक व्हिडिओ तयार करत आहेत.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साह्याने पक्षाचे विविध नेते, माझे, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व काही मुख्यमंत्र्यांच्या आवाजात व्हिडिओ तयार करून पसरवत आहेत. नको ती वाक्ये आमच्या तोंडी घालून आग पसरविण्याचे काम सुरू आहे.