नंदनवन परिसरात एकाने पत्नीवर चारित्र्याच्या संशय घेवून आणि पतीने दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यावर हतोड्याने घाव घालत तिची निर्घृण हत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.१८) रोजी दुपारच्या सुमारास घडली.
अर्चना रमेश भारस्कर ( वय ३८ वर्ष, राहणार नंदनवन झोपडपट्टी गल्ली नंबर दोन) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर तिच्या पतीचे नाव रमेश भारस्कर असे आहे.
याबाबतची माहिती अशी की, अर्चनाचा पती रमेश भारस्कर याने नेहमीप्रमाणे आजही तिच्यावर चारित्र्याचा संशय घेत वाद घातला. या वादाच्या दरम्यान संतापाच्या भरात रमेशने अर्चनाच्या डोक्यावर हातोड्याने वार करून तिची हत्या केली.
या घटनेनंतर नंदनवन पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलिस करीत आहेत. रमेश एका खासगी कंपनीत कामाला असून त्याला दारुचे वेसन होते. तर तो पत्नीवर नेहमी संशय घ्यायचा त्यामुळे त्यांच्यात वारंवार भांडण होत होते. अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.