राज्यात पावसाने आखडता हात घेतल्यामुळे निर्माण होणार्या परिस्थितीचा विचार करून अब्दुल सत्तार हे कृषी खाते सोडणार असल्याचे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खाते बदलासाठी त्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत.
राज्यात 8 ते 15 जून या कालावधीत हमखास पाऊस पडतो. परंतु, जुलैचे दोन आठवडे उलटून गेले तरी कोकणातील काही भाग वगळता राज्यात समाधानकारक पाऊस नाही.
काही तालुक्यांमध्ये पडलेल्या पहिल्या रिमझिम पावसावर शेतकर्यांनी पेरण्या केल्या आहेत; तर अनेक ठिकाणच्या शेतकर्यांनी पाऊस पडेल, या आशेवर बियाणे घेऊन ठेवले आहे.