पाकिस्तानातील सामान्य जनतेचे कंबरडे महागाईने मोडले आहे. लष्कर आणि राजकीय नेते या दोन्ही घटकांनी देशाच्या तिजोरीवर डल्ला मारून लोकांना भिकेकंगाल करून सोडले आहे. पाकमध्ये एका वर्षात 1 किलो मैद्याच्या किमतीत 146 टक्के वाढ होऊन त्याने 150 पाकिस्तानी रुपयांचा टप्पा पार केला आहे. तांदळाचे भावही 114 रुपयांवरून 350 रुपये किलो झाले आहेत. पेट्रोल तर तब्बल 88 टक्क्यांनी महागले आहे.
पाकिस्तानातील महागाईचा दर 36.4 टक्के अन्नधान्याच्या महागाईतील वाढ 48.1 टक्के कपडे, चपलांच्या किमतीतील वाढ 21.6 टक्के