प्रतीक लाड, हंसराज जगताप, अरबाज शेख, घनश्याम दरवडे (छोटा पुढारी) यांची मध्यवर्ती भूमिका
‘पिक्चर बॉईज’ १५ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात
“Picture Boys” is a great summer vacation entertainer
Prateek Lad, Hansraj Jagtap, Arbaaz Sheikh, Ghanshyam Darwade (Chhota Pudhari) in central roles
‘Picture Boys’ to be released across Maharashtra from May 15



चित्रपटात हिरो बनण्यासाठी धडपड करणाऱ्या तरुणांची गोष्ट आता ‘पिक्चर बॉईज’ या चित्रपटातून पाहता येणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत १५ मे पासून हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना कॉमेडीचा डोस मिळणार आहे. चित्रपटाचं दमदार पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे.
त्रिमूर्ती फिल्म्सनं ‘पिक्चर बॉईज’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रवी पांडुरंग पंडितपवार, राजा पांडुरंग पंडितपवार हे या चित्रपटाचे निर्माते असून शिवाजी केशव पाटील हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शन निलेशसिंग राजपूत यांनी केलं आहे. मंदार चोळकर, सुनील दोडगे, संध्या-प्रनिकेत यांनी लिहिलेल्या गीतांना वरुण लिखाते आणि संध्या-प्रनिकेत यांनी संगीतबद्ध केले आहे. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, जसराज जोशी, स्वप्नील गोडबोले, वरुण लिखाते, एल. के. लक्ष्मीकांत यांनी चित्रपटातली गाणी गायली आहेत. विनोद पाटील यांनी छायांकन, रोहन पाटील यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे.
चित्रपटातूनच चित्रपटाची गोष्ट सांगण्याचा प्रकार या पूर्वी अनेकदा हाताळला गेला आहे. मात्र, चित्रपटात हिरो बनण्याची धडपड असलेल्या तरुणांची गोष्ट विनोदी, मनोरंजक पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न “पिक्चर बॉईज” या चित्रपटातून करण्यात आला आहे. प्रतीक लाड, हंसराज जगताप, अरबाज शेख, घनश्याम दरवडे (छोटा पुढारी) आणि इतरही नव्या जुन्या कलाकांची फळी चित्रपटात आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत पुरेपूर मनोरंजन करणारा “पिक्चर बॉईज” हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहणं पर्वणीच ठरणार आहे.