

नारायणगाव:
नारायणगाव येथील हर्षली कृषी उद्योग हे कृषी औषधांसाठी प्रसिद्ध दुकान आहे.या खत व औषधाच्या दुकानावर नारायणगाव पोलिसांनी छापा टाकण्यात आला.यामध्ये ब्रँडेड कंपन्यांची मोठ्या प्रमाणात नकली औषधे सापडल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहे.नारायणगाव पोलिसांनी याबाबत हर्षली कृषी उद्योग या दुकानाचे मालक नारायण तानाजी आरोटे (वय वर्ष 43.रा.नारायणगाव )यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.सदर दुकानामध्ये नारायण तानाजी आरोटे यांनी गोदरेज कंपनीचा सुपर शक्ती कोंबाईन या औषधाचे हुबेहूब नकली साठा करून ठेवला होता.गोदरेज कंपनीच्या प्रतिनिधीने नारायणगाव पोलिसांच्या मदतीने हर्षली कृषी उद्योग या दुकानामध्ये जाऊन कारवाई केली आहे.