अकरा वर्षाची मुलगी जेवण करत नसल्याच्या कारणावरुन कारेगाव येथील एका महिलेने स्वतःच्या पोटच्या मुलीला बेदम मारहाण केल्याने कोमल आदित्य उत्तम (रा. बाभुळसर रोड, कारेगाव रोड, ता. शिरुर जि. पुणे) हिच्यावर रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोमल उत्तम हि महिला कारेगाव येथे राहण्यास असुन तिची 11 वर्षीय मुलगी जेवण करत नसल्याच्या कारणावरुन तिच्या आईने तिला लाकडी काठीने हातावर, पायावर,पाठीवर मारहाण केली तसेच लोखंडी चमच्याने हातावर व पायावर चटके दिले.
त्यानंतर हि मुलगी शाळेत गेल्यानंतर एका शिक्षिकेच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्या शिक्षिकेने रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला धाव घेतली. तसेच पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आणुन दिला.
त्यानंतर संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात असुन रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विद्या बनकर या घटनेचा पुढील तपास करत आहेत.