लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी महायुती सरकार संविधान बदलणार असल्याचा प्रचार प्रसार केला. लोकांची दिशाभूल करण्याचे काम त्यांनी केले. आपण अपप्रचाराला बळी पडले. देशाचे संविधान संपविण्याची कुणाचीही ताकद नाही. त्यामुळे आपण निश्चिंत राहा. आरक्षणाला धक्का लागणार नाही. अन्यथा राजकारण सोडेन, अशी ग्वाही खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
शुक्रवारी स्थानिक वात्सल्य सभागृहात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी आ. मनोहर चंद्रिकापुरे, जि.प. उपाध्यक्ष यशवंत गणवीर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रेम रहांगडाले, नगराध्यक्ष मंजूषा बारसागडे, अविनाश ब्राह्मणकर, नामदेव डोंगरवार, दानेश साखरे, डॉ. सुगत चंद्रिकापुरे, भोजराम रहेले, राकेश लंजे, चित्ररेखा मिश्रा, माधुरी पिंपळकर, सुशीला हलमारे उपस्थित होते.
खा. पटेल म्हणाले, गोंदिया-भंडारा जिल्ह्यात पावसाने थैमान घातले. शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसानभरपाई मिळण्यासंदर्भात पाठपुरावा करू. केंद्र व राज्य सरकारने जनता जनार्दनाच्या हितासाठी अनेक योजना आणल्या. मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली. शेतीमालाला बोनस देण्याची प्रथा २००९-१० मध्ये प्रफुल्ल पटेलांनी आणली.
शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सन्माननिधी मिळतो. आता मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील ९३ हजार महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. आम्ही हे केले.
ते केले हे आम्हालाच सांगावे लागते ही बाब चुकीची आहे. या कामांना विसरून चालता येणार नाही. विचारसरणी बदला. भरभरून केलेल्या कामांची जाणीव ठेवा. हिमतीने लोकांपर्यंत जाऊन विकासकामे सांगा, असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.
आम्हाला १५०० नको, मुलांना रोजगार द्याया कार्यकर्ता मेळाव्यात महिला वर्गही उपस्थित होता. भाषण आटोपताच खा. पटेल बाहेर जात असताना महिलांनी आम्हाला १५०० नको, मुलांना रोजगार द्या, अशी मागणी त्यांच्याकडे केली. १० वर्षांत जे झाले नाही ते साडेतीन वर्षांत झाले२०२६ मध्ये नवीन मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे. महिला आरक्षण येणार आहे.
त्यामुळे राज- कारणात बरेच बदल बघायला मिळणार असल्याचेही ते म्हणाले. आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी गेल्या १० वर्षात जी कामे झाली नाहीत ती अवघ्या साडेतीन वर्षात करून दाखविली. गेल्या १५ दिवसांत ३४२ कोटींचा निधी मंजूर केला. इटियाडोह, उमरझरी, चुलबंद, झाशीनगर सिंचन प्रकल्पांसाठी भरीव निधीची तरतूद केली असल्याचे त्यांनी सांगितले.