खा. शरद पवारांनी मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे.
मराठा व ओबीसी समाजामधील सामाजिक दरी कमी करण्याऐवजी आगीत तेल ओतण्याचे काम पवार करीत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
माढ्यातील ओबीसी आरक्षण यात्रेदरम्यान ते बोलत होते. राज्यात दंगली घडवण्याचा पवारांचा प्रयत्न आहे का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.