पृथ्वीराज चव्हाण : राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा देशात एक चळवळ उभी करेल

Photo of author

By Sandhya

पृथ्वीराज चव्हाण

काँग्रेसचे नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा देशात एक चळवळ उभी करेल, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमधून सुरुवात झाली. त्यासंदर्भात चव्हाण यांनी मत व्यक्त केले. आमदार चव्हाण यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या प्रचार यंत्रणेचा आज सातारा जिल्ह्यात प्रारंभ केला.

यावेळी त्यांनी भारत जोडो न्याय यात्रेचे स्टिकर आपल्या वाहनाला लावून यात्रेमधील सहभाग नोंदविला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार चव्हाण म्हणाले, ‘‘राहुल गांधी यांची न्याय यात्रा देशात अन्यायाविरोधात लोकचळवळ उभी करेल.

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा मणिपूर ते मुंबई अशी असणार आहे. ती यात्रा १५ राज्यातून १९९ जिल्ह्यांतून जवळपास सहा हजार ५०० किलोमीटरची आहे.

भारत जोडो यात्रेच्या यशस्वितेनंतर राहुल गांधी अन्यायाच्या विरोधात जनआंदोलन उभे करत आहेत. त्यासाठीच त्यांची ही न्याय यात्रा असेल. यावेळी राहुल गांधींच्या सोबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेसचे वर्किंग कमिटी सदस्य, काँग्रेसचे खासदार उपस्थित होते.

Leave a Comment

You cannot copy content of this page