पुणे बाजार समिती निवडणूक, मतदान केंद्रे जाहीर

Photo of author

By Sandhya

पुणे बाजार समिती निवडणूक, मतदान केंद्रे जाहीर

पुणे – तब्बल 24 वर्षांनी होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या निवडणूकीसाठी 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी मतदार संघ निहाय मतदान केंद्रे जाहीर झाली आहेत. एकुण 18 जागांसाठी 17 हजार 812 जण मतदान करणार आहेत.

सर्वाधिक सेवा सहकारी संस्था गटातून 11 उमेदवार निवडून येणार आहेत. याबरोबरच ग्रामपंचायात गटातून 4, व्यापारी/आडते गटातून 2 आणि हमाल मापाडी गटातून 1 उमेदवार विजयी होणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी याबाबत माहिती दिली.

दरम्यान व्यापारी/आडते गटात सर्वाधिक चुरस आहे. सर्वाधिक मतदार आहेत. निवडणूकीसाठी दोन पॅनेल झाले आहेत. मात्र, व्यापारी गटात पॅनेलने कोणालाही पाठींबा दिलेला नाही. इथे दोन-दोन उमेदवारांनी पॅनेल बनविला आहे.

मतदार संघ मतदारांची संख्या मतदानाचे ठिकाण -सहकारी सेवा संस्था 1918 पर्वती येथील श्री संदीप माणिकराव सातव पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल, अरणेश्‍वर तळजाई रोड -ग्रामपंचायत 713 पर्वती येथील श्री संदीप माणिकराव सातव पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल, अरणेश्‍वर तळजाई रोड -व्यापारी/आडते 13,174 शुक्रवार पेठ येथील शिवाजी मराठा हायस्कुल -हमाल/तोलणार 2007 मार्केट यार्ड येथील हमाल पंचायत भवन

Leave a Comment