पुणे-बंगळूर महामार्गावर एसटीचा अपघात; दहा ते पंधरा प्रवाशी जखमी

Photo of author

By Sandhya

पुणे-बंगळूर महामार्गावर एसटीचा अपघात; दहा ते पंधरा प्रवाशी जखमी

पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर कराड सातारा दिशेकडे भरधाव वेगाने जाणारी एसटी मांड नदीवरील पूलाच्या कठड्याला धडकून पलटी झाल्याची घटना घडली.

या अपघतात चालक व वाहक यांच्यासह जवळपास दहा ते पंधरा प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (दि ६ जुलै) दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास कराडहून सातारा दिशेकडे जाणारी विजापूर-सातारा एसटी (क्रमांक केए-२८-२३५०) चालकाचा ताबा सुटल्याने पूलाच्या कठड्याला धडकून महामार्गावर पलटी झाली. एसटी धडकल्याने मोठा आवाज झाला.

त्यामुळे शिवडे तसेच परीसरातील नागरिकांनी व महामार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशानी जखमींना तात्काळ बाहेर काढून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. एसटीमध्ये तीस प्रवाशी होते.

या अपघातात जवळपास दहा ते पंधरा प्रवाशी जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनास्थळी पोलिस हवालदार आळंदे, निलेश पवार, भोसले, काळे यांनी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.

Leave a Comment