PUNE BIG NEWS : मार्केटयार्ड येथील गोडाऊनला लागली भीषण आग

Photo of author

By Sandhya

भीषण आग

नुकतंच पुण्यात टिंबर मार्केटमध्ये लागलेल्या आगीत व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. ही आगीची घटना ताजी असताना मार्केटीयार्डमधील गोडाऊनला आग लागल्याचे समोर आले आहे. रविवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास मार्केटायर्ड येथे आग लागल्याची घटना समोर आली आहे. तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, अंदाजे ५००० स्क्वे.फुट गोडाऊनमधे कागद रद्दी व काही प्रमाणात पुठ्ठा असणाऱ्या मालाला मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. जवानांनी तातडीने गोडाऊनचा मुख्य दरवाजाचे बोल्ड कटरच्या साह्याने कुलुप तोडत चोहोबाजूंनी पाण्याचा मारा सुरू केला.

आग मोठी असल्याने जवानांनी अतिरिक्त मदत अग्निशमन वाहनांना पाचारण केले.तसेच आतमधे कोणी कामगार अथवा नागरिक अडकला नाही ना याची ही खात्री यावेळी जवानांनी केली.शेजारीच रहिवाशी इमारत असल्याने आग त्या दिशैला पसरु नये याची विषेश खबरदारी घेत पाण्याचा मारा सुरू ठेवत सुमारे तासाभरात आग आटोक्यात आणली.

यावेळी गोडाऊनमधे असलेले रद्दीचे कागद पुर्णपणे जळाले. घटनास्थळी गोडाऊनमधे असलेले दोन टेम्पो ही जळाले. नुकसान व आगीचे कारण समजू शकले नाही. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी विजय भिलारे यांच्या नेतृत्वाखाली कामगिरी पार पडली.

Leave a Comment