PUNE BIG NEWS : कोल्हापुरातील दंगलीमुळे पुण्यात सतर्कतेचे आदेश

Photo of author

By Sandhya

दंगली

कोल्हापुरातील दंगलीच्या पार्श्वभूमीवर सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील सर्व पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सतर्कतेचे आदेश दिले आहे.

रात्री उशिरापर्यंत शहरातील घडामोडींवर लक्ष ठेवण्याचे आदेश सहपोलिस आयुक्त कर्णिक यांनी शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले आहेत.

कोल्हापुरात बुधवारी (7 जून) तणाव निर्माण झाला. दंगलसदृश परिस्थितीमुळे कोल्हापुरात जनजीवन विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिसआयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला.

समाजमाध्यमातील संदेशांवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांनी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात थांबावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

समाजमाध्यमातून आक्षेपार्ह संदेश प्रसारित करणार्‍यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page