PUNE : निवडणूक कामकाजामुळे स्वारगेट वाहतूक व्यवस्थेत बदल…

Photo of author

By Sandhya

निवडणूक कामकाजामुळे स्वारगेट वाहतूक व्यवस्थेत बदल

विधानसभा निवडणूक २०२४च्या कामकाजाच्या अनुषंगाने गणेश कला क्रीडा रंगमंच स्वारगेट येथून मतदान प्रक्रियेच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या पीएमपीएमएल बसेसच्या वाहनतळाकरीता जागा उपलब्ध व्हावी, तसेच पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता दि. २० नोव्हेंबरला स्वारगेट वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत बदल करण्यात येत आहे.

स्वारगेट ते नेहरू स्टेडियम दरम्यान दि. २० नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये पुढीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे.

जेधे चौकातून सारसबागेकडे जाणारी वाहतूक हॉटेल नटराजकडील लेनवर प्रवेश बंद येणार आहे. नागरिकांना जेधे चौकातून सारसबागेकडे जाण्यासाठी ओव्हरब्रिज खालील डावीकडील लेनने इच्छित स्थळी जाता येणार आहे.

सोलापुर रोडने जेधे चौक अंडरपासने सारसबागेकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येणार आहे. नागरिकांना सोलापूर रोडने येणाऱ्या वाहनांनी जेधे चौक ओव्हर ब्रीज खालील डावीकडे वळण घेऊन होल्गा चौकामध्ये उजवीकडे वळण घेऊन इच्छित्त स्थळी जाता येणार आहे, असे पुणे शहर वाहतूक शाखेचे उप आयुक्त अमोल झेंडे यांनी कळविले आहे. 

Leave a Comment