PUNE CRIME : ऑनलाइन टास्कच्या आमिषाने 37 लाख 62 हजार रुपयांची फसवणूक

Photo of author

By Sandhya

37 लाख 62 हजार रुपयांची फसवणूक

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी महिलेसह दोघांची 37 लाख 62 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका तरुणाने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी संदेश पाठविला होता. घरातून ऑनलाइन काम केल्यास चांगले पैसे मिळतील, असे आमिष चोरट्यांनी त्याला दाखविले होते.

पुणे शहरातील उपहारगृहांची माहिती देणारा मजकूर समाजमाध्यमातून प्रसारित करण्यात येणार असून, त्याला ऑनलाइन पद्धतीने दर्शक पसंती मिळवून देण्यचे काम केल्यास चांगले पैसे मिळतील, असे सांगून चोरट्यांनी त्याला जाळ्यात ओढले.

त्यानंतर चोरट्यांनी त्याला काम दिले. हे काम पूर्ण केल्यानंतर चोरट्यांनी त्याला लगेच 150 रुपये ऑनलाइन पद्धतीने दिले. पैसे मिळाल्यानंतर तरुणाचा विश्वास बसला.

चोरट्यांनी पुन्हा त्याच्याशी संपर्क साधला. ऑनलाइन टास्कमध्ये पैसे गुंतविल्यास चांगले पैसे परताव्यापोटी मिळतील, असे सांगितले. चोरट्यांनी वेळोवेळी त्याच्याकडून ऑनलाइन पद्धतीने 17 लाख 70 हजार 326 रुपये घेतले. खात्यात पैसे जमा झाल्यानंतर चोरट्यांनी त्याच्याशी संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिस ठाण्यात धाव घेतली.

Leave a Comment

You cannot copy content of this page