पुणे | वाघोली मध्ये डंपर ने नऊ जणांना चिरडले.

Photo of author

By Sandhya


पुणे : तिघांचा जागीच मृत्यू;डंपर चालक दारूच्या नशेत.

वाघोली येथील केसनंद फाट्यावरती पुण्याकडून येणाऱ्या भरघाव बिल्टवेस् इंटरप्राईजेस कंपनीच्या
डंपरने फूट पाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले.या मध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये मुलांच्या काकांसह दोन बालकांचा समावेश आहे.तर सहा जण गंभीर जखमी झाले. जखमी मधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.ही घटना रात्री बार ते एक वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील केसनंद फाट्यावर पोलीस ठाण्याच्या समोरच घडली.डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता.त्याला स्वतःच्या पायावर देखील उभा राहत येत नव्हते.
वैभवी रितेश पवार ( वय १ वर्षे ), वैभव रितेश पवार (वय २ वर्षे),रीनेश नितेश पवार,(वय ३० वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. तर सहा जण जखमी आहेत. जखमींना ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे.तर काहींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.रविवारी रात्रीच ते अमरावती येथून ते बिगारी व मजुरी कामासाठी आले होते.जवळपास एकाच कुटुंबातील बारा जण फूटपाथवर झोपले होते.तर शंभर ते दीडशे जण फूटपाथ च्या बाजूला झोपड्यात झोपले होते यामध्ये काही इतर राज्यातील आहेत तर काही महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून आलेले हाताला मिळेल ते काम करणारे सर्व मजुरी कामगार आहेत. वाहन चालक दारूच्या नशेत असल्याने त्याचा नंबर वरील दावा सुटून डंपर सरळ फूटपाथवर चढून झोपलेल्या अंगावर गेला. केसनंद फाट्यावरील ही दुर्घटना घडल्यानंतर घटनेमध्ये जखमी व मृत्यू झालेल्यायांचे नातेवाईक हंबरडा फोडत होते. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

Leave a Comment