PUNE : जिल्ह्यातील 84 गावांना पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा? जाणून घ्या…

Photo of author

By Sandhya

जिल्ह्यातील 84 गावांना पुराचा धोका

गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहता पुन्हा-पुन्हा पूर येणार्‍या गावांना पूरप्रवण म्हणून उपाययोजना केल्या जातात. जिल्ह्यातील 84 गावांना पुराचा धोका असून, या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

तर शासकीय अधिकार्‍यांना मुख्यालयी थांबावे, अशा सूचना करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यामधील पूरप्रवण गावांची यादी प्रशासनाने जाहीर केली आहे. त्यात दौंड तालुक्यातील सर्वाधिक 16 गावे आहेत. त्यानंतर मावळमधील दहा, आंबेगाव आणि शिरूरमधील प्रत्येकी नऊ, मुळशीतील सात, भोरमधील तीन गावांचा समावेश आहे.

इंदापूर, बारामती, खेडमध्ये प्रत्येकी एक, जुन्नरमधील दोन गावांचा समावेश आहे. या गावांकडे विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रशासनाला दिले आहेत.

हिंगणे खुर्द, विठ्ठलवाडी, पुलाचीवाडी, पाटील इस्टेट, येरवड्यातील शांतीनगर आणि इंदिरानगर, संगमवाडी, लोणीकाळभोर, चांदे, वाकड, औंध, दापोडी, सांगवी, बाणेर, हिंगणगाव, पिंपरी, चिंचवड, कासारवाडी, फुगेवाडी, पिंपळेसौदागर, पिंपळे गुरव, रहाटणी, चोवीसवाडी, निरगुडे, सांगवी या गावांना पुराचा धोका आहे.

जिल्ह्यातील भोरमधील पर्‍हाटी, लुमेवाडी आणि निरा, खेड तालुक्यामधील सांगुर्डी, आंबेगाव तालुक्यातील चांडोली, पारगाव, निगुडसर, नारेाडी, चिंचोली, जवळे, पडवळ, गणेगाव दुमाला, बाभुळसर आदी गावांचा समावेश आहे.

Leave a Comment