पुण्यातील नक्की कोणते आणि किती आमदार अजित पवारांबरोबर? जाणून घ्या…

Photo of author

By Sandhya

पुणे जिल्ह्यातील 'हे' आमदार अजित पवारांबरोबर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील जवळपास सर्वच आमदारांनी अजित पवार यांच्या बंडाला साथ दिल्यामुळे जिल्ह्यामध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. आंबेगाव-शिरूरचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी तर मंत्रिपदाची शपथही घेतली आहे.

जुन्नरचे अतुल बेनके, खेड-आळंदीचे दिलीप मोहिते पाटील, इंदापूरचे दत्तात्रय भरणे, मावळचे सुनील शेळके, शिरूरचे अशोक पवार या सर्व आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच आमदारांचा पाठिंबा मिळवण्यात सध्यातरी अजित पवार यशस्वी ठरले आहेत.

पुणे शहरात खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्यासह शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवारांच्या समवेत थांबण्याचा निर्णय घेतला, तर दोन आमदारांपैकी वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे आणि हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी मात्र त्यांची थेट भूमिका जाहीर केलेली नाही.

पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी अजित पवार यांच्याबरोबर राहणार असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे शिरूरचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, रविवारच्या शपथविधी सोहळ्यात ते उपस्थित होते

Leave a Comment