शहरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन करण्यात आले.
कसबा परिसरातील पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रशासनाचा निषेध करण्यासाठी भरपावसात खड्डे पेटवा आंदोलन करण्यात आले. खड्ड्यांना हार फुले वाहून अच्छे दिन’ला श्रद्धांजली वाहण्यात आली.
खराब रस्ते, खड्डेमय रस्ते आणि मोठ्या प्रमाणावर खचलेले ड्रेनेज चेंबर याच्या विरोधात चिंचेची तालीम, सत्यवान मारुती, शितळा देवी चौक, काचे आळी आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
याविरोधात हे आंदोलन करण्यात आले. तत्काळ या भागातील तसेच संपूर्ण शहरातील खड्डे दुरुस्ती करावी अन्यथा महापालिकामध्ये असेच तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसेकडून देण्यात आला.