कोथरूड परिसरातून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. मागील वर्षभरापूर्वी राजस्थानमध्ये देशविघातक कारवायांप्रकरणी त्यांच्याविरुद्ध राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुन्हा दाखल केला होता, तेव्हापासून फरार झाल्यानंतर दोन्ही आरोपी पुण्यातील कोंढवा परिसरात कास्तक्यास होते.
त्यांच्या घरातून जिवंत काडतूस, चार मोबाईल, लॅपटॉप, दुचाकी चोरीचे साहित्य जप्त केले आहे. लॅपटॉपमध्ये देशविघातक कारवायांसंदर्भात माहिती असल्याचे उघडकीस आले आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन आणि ठिकठिकाणच्या पोलीस गस्तीमुळे दहशतवाद्यांना अटक करण्यात यश आले आहे.
इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी (दोघेही रा. रतलाम, मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नाके आहेत. त्यांचा साथीदार पसार झाला असून, त्याचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी कोथरूड ठाण्यातील बीट मार्शल प्रदीप चक्हाण, अमोल नाझण यांच्या दक्षतेचे कौतुक केले जात आहे.