पुणे-मुंबई महामार्गावर गॅस टॅंकर पलटी; 50 पोलीस घटनास्थळी

Photo of author

By Sandhya

गॅस टॅंकर पलटी

पुणे-मुंबई महामार्गावर आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास गॅस वाहतूक करणारा भारत पेट्रोलियम कंपनीचा गॅस टॅंकर पलटी झाल्याची घटना घडली आहे.

मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा टँकर पलटी झाला आहे. चालकाचे टँकरवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला आहे. या घटनेमुळे जुन्या महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात काल मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास भारत पेट्रोलियम कंपनीचा गॅस टँकरचा अपघात झाला.

टँकर चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने वाहन उलटून हा अपघात झाला आहे. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बीपीसीएल कंपनीच्या गॅस टँकरचा हा अपघात झाला आहे.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील मधुकरराव पवळे पुलाच्या सुरुवातीलाच हा अपघात झाला असल्याची माहिती आहे. ही घटना समजताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अग्निशमन टीम, मुख्य अग्निशमन अधिकारी विजय थोरात, श्री. चिपाडे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, उपायुक्त रविकिरण घोडके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांच्यासह 50 पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या गॅस ट्रान्सफर करण्यासाठी वाहने आले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

Leave a Comment