पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वेगाड्यांच्या डब्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता

Photo of author

By Sandhya

पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वेगाड्यांच्या डब्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता

मध्य रेल्वेकडून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात  रेल्वेच्या पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वेगाड्यांच्या डब्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर दररोज हजारोंच्या संख्येने लोक ये-जा करतात.

सध्या या मार्गावर प्रवाशांना जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांचे प्रवास करताना हाल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने मुंबई येथील प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे आगामी काळात काम संपल्यावर गाड्यांचे डबे वाढविण्याची शक्यता आहे.

गाड्यांमध्ये मारामारीच्या घटना, आरक्षण करून देखील रेल्वेत बसायला जागा मिळत नसल्यामुळे हाणामारीच्या घटना घडत आहेत. असे प्रकार पुणे-मुंबईदरम्यान धावणार्‍या गाड्यांमध्ये होतात. सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन या गाड्यांमध्ये अशा  घटना अनेकदा घडतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्राधान्याने या गाड्यांचे डबे वाढविण्याची गरज आहे. पुणे आणि परिसरातील रेल्वे संघटनांकडून सातत्याने अशी मागणी करण्यात येत आहे.

Leave a Comment