पुणे | ऋषिराज सावंत प्रकरणावरून पवार गट आक्रमक, तानाजी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी.

Photo of author

By Sandhya



पुणे: माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने केली आहे. तानाजी सावंत यांनी मुलाचे अपहरण झाल्याचे सांगून सरकारी यंत्रणेला वेठीस धरले होते. यावरुन पवार गट आक्रमक झाला आहे. माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज हा पुण्यातील लोहगाव विमानतळावरून सोमवारी दुपारी गायब झाला होता.

गृहकलहातून बँकॉक निघाल्याचा दावा
ऋषिराज सावंत याचा त्याच्या वडिलांसोबत म्हणजे तानाजी सावंत यांच्यासोबत वाद झाल्यानंतर तो बँकॉकला निघाला होता, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा प्रवक्ते सुनील माने यांनी केला आहे. सरकारी यंत्रणेला वेठीस धारणाऱ्या तानाजी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी सुनील माने यांची मागणी आहे.पवार गटाचं म्हणणं काय?
ऋषिराजचे त्याच्या वडिलांसोबत म्हणजे तानाजी सावंत यांच्यासोबत वाद झाल्यानंतर तो बँकॉकला निघाला होता. मात्र, त्यांच्यातला गृहकलह लपवून ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावंत यांनी खोटी माहिती दिली. त्या माहितीनुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना सूचना केल्या. त्यांनी पुणे पोलिस आयुक्तांना सूचना केल्या. त्यानंतर त्याचे काही तरी बरे वाईट होईल; म्हणून एफआयआर दाखल करण्यात आला. अशाप्राकारे चुकीच्या माहितीच्या आधारे ऋषीराजचे विमान परत पुण्यात बोलवण्यात आले.

गुन्हा दाखल करण्याची मागणी
शासकीय यंत्रणेचा कशा प्रकारे दुरुपयोग केला जातो. यंत्रणांना कशा प्रकारे वेठीस धरले जाते, याचे उदाहरण पुण्यात सोमवारी पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोटी माहिती देणे, शासकीय यंत्रणांना वेठीस धरणे, घरातील भांडणाचा विषय सार्वजनिक करून त्यासाठी शासकीय यंत्रणांचा त्यासाठी वापर करणे, हे कायद्याने गुन्हा ठरवला पहिजे. त्यासाठी माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मानेंची मागणी आहे.

Leave a Comment