पुणे | बोपदेव घाटात पीएमपी आणि ट्रकचा अपघात – सुदैवाने जीवितहानी टळली!

Photo of author

By Sandhya


पुणे : पुणे-सासवड मार्गावरील बोपदेव घाटात पीएमपी व ट्रकचा अपघात झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, बसमधील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, पीएमपी बस कात्रजवरून सासवडच्या दिशेने चालली होती. तर ट्रक हा सासवडवरुन पुण्याच्या दिशेने निघाला होता. दरम्यान या दोन वाहनांची बोपदेव घाटातील तीव्र वळणावर समोरासमोर धडक झाली. सकाळची वेळ असल्याने सर्वांची कामावर जाण्याची वेळ होती. त्यातच या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने विद्यार्थी व कामगार वर्गाचा खोळंबा झाला. बोपदेव घाटातील तीव्र वळणावरील रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page