पुणे पंढरपूर महामार्गावर पिंपरे येथे ओमिनी कारची दोन मोटरसायकलला धडक

Photo of author

By Sandhya

पुणे पंढरपूर महामार्गावर पिंपरे येथे ओमिनी कारची दोन मोटरसायकलला धडक

पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर महामार्गावर नीरा पिंपरे दरम्यान ओमनी कारची दोन मोटरसायकलला धडक बसलिय. यामध्ये मोटरसायकल वरील दोघे आणि ओमीनी चालक गंभीर जखमी झालेत.

त्यांना उपाचारा साठी नीरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अपघातानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. व रस्त्यावरील वाहने बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केलाय..

या संदर्भात निरा पोलीस आणि स्थानिक प्रत्यक्ष दर्शि लोकांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नलवाडीकडून निरेकडे निघालेली मारुती व्हॅन क्रमांक एम एच 12 क्यू टी 5286 या कराचा चालक बाळासाहेब निगडे यांना रस्ता तिरपा असल्याने रस्त्याचा अंदाज आला नाही.

त्यामुळे त्यांचे कार वरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी निरेहून पिंपरेकडे निघालेल्या दोन मोटार सायकळला त्यांची समोरा समोर धडक बसली. धडके नंतर ओमानी कार रस्त्याच्या कडेला पलटी झाली. यामध्ये बाळासाहेब निगडे गंभीर जखमी झालेत.

त्याच बरोबर मोटार सायकल वरील दोन जन गंभीर जखमी झालेत. यामध्ये दिपक डोईफोडे आणि अखिल सय्यद हे गंभीर जखमी झालेत. तर कार मधील आणखी चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.

पोलीस कॉन्स्टेबल संदीप मदने व विजय करे यांनी तातडीने घटनास्थळी येऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवून वाहतूक सुरळीत केलीय.

Leave a Comment