पुणे | अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक मार्गात बदल; अवजड वाहनांना बंदी

Photo of author

By Sandhya


पुणे – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त शनिवारी (२२ फेब्रुवारी) बाणेर आणि बालेवाडी भागातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. रेसकोर्सजवळील पाण्याची टाकी ते टर्फ क्लब रस्ता हा वाहतुकीसाठी दुतर्फा खुला करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

वाहतूक बदलांनुसार, आचार्य आनंदऋषीजी चौकातून बाणेर रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना गणराज चौकातून डावीकडे वळून भुयारी मार्गाने जावे लागणार आहे. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरून बाणेरकडे जाणाऱ्या वाहनांना बालेवाडी जकात नाका चौकातून हाय स्ट्रीटमार्गे जावे लागेल. दरम्यान, विद्यापीठ चौक ते चांदणी चौक व राजीव गांधी पूल दरम्यान सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असून, ही बंदी शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page