PUNE : यंदाही पुण्याची ‘तुंबई’ होणार का ?

Photo of author

By Sandhya

तुंबई

महापालिकेने शहर तसेच उपनगरांत समान पाणी पुरवठा योजना, पावसाळी गटारे, सांडपाणी गटारे, मोबाइल केबल, विद्युत वाहिनी, गॅस वाहिनी अशा कामांसाठी गेल्यावर्षी मे महिन्यांच्या मध्यानंतरच खोदकाम सुरू केले होते,

त्यामुळे गेल्यावर्षी पावसाळ्यात पुण्याची “तुुंबई’ झाली होती. मे महिन्यांपूर्वीच शहर, उपनगरांतील प्रमुख रस्त्यांची दुरूस्तीची कामे अपेक्षित असताना यावर्षीही महापालिकेने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर 111 कोटी 16 लाख रुपयांच्या दोन निविदा स्थायी समितीमध्ये मंजूर केल्या.

यातून 41 कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे. कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीची आचारसंहिता, त्यानंतर राबविलेल्या निविदा प्रक्रिया यातही वेळ वाया गेल्याने शहरातील मध्यवर्ती पेठा यासह कोथरूड, बावधन, विमाननगर, धानोरी, कात्रज-कोंढवा, फुरसुंगी, धायरी यासह इतर उपनगरीय रस्त्यांची कामे मंजूर करण्यास तीन महिने उशीर झाल्याने ती आता सुरू केली जाणार आहेत

त्यामुळे याही पावसाळ्यात “तुंबई’चा अनुभव येणार का? असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. उपनगरांतील या रस्त्यांचे होणार काम… शहर तसेच उपनगरांतील रस्त्यांतील खड्ड्यांची दुरूस्ती, डांबरीकरण, रस्ता समपातळीत आणणे ही कामे करण्यात येणार आहेत.

यामध्ये हांडेवाडी रस्ता, एनआयबीएम चौक ते पॅलेस ऑर्चिड, कौसरबाग रस्ता, काळेपडळ गजानन महाराज मंदिर रस्ता, फुरसुंगी ते खुटवड चौक, आंबेगाव येथील दरी पुलाजवळील रस्ता, आंबेगाव खुर्दमधील रस्ता, कात्रज, वडगाव खुर्द, वडगाव बुद्रूक, धायरीतील अंतर्गत रस्ता, वानवडीतील सनग्रेस शाळा, कोंढवा-मिठानगर येथील रस्ता.

Leave a Comment