पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी मेट्रोच्या दुसर्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर पुणेकरांनी मोठ्या उत्साहात मेट्रो प्रवासाचा आनंद घेतला. ज्येष्ठ नागरिक, तरुणाई आणि कुटुंबीयांसह बालचमूने मेट्रोत फिरण्याचा आनंद घेतला.
कोथरूडकरांचा पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनानंतर वनाज ते गरवारे असा प्रवास सुरू होता. त्यानंतर मंगळवारी त्यांनी वनाजपासून थेट पिंपरीपर्यंत प्रवास केला, तर अनेक चाकरमानी पिंपरीवरून थेट कोथरूडला आपल्या घरी मेट्रोने परतले.
दुसर्या टप्प्याच्या सुरुवातीमुळे दोन शहरे एकमेकांना जोडली गेली असून, पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.