जंतुसंसर्ग, जन्मत: असणारे दोष, कमी वजन, नियमित लसीकरणाचा अभाव अशा विविध कारणांमुळे नवजात बालकांचा दुर्देवी मृत्यू होतो. शहरात गेल्या तीन महिन्यांमध्ये वर्षांमध्ये 0 ते 51 वर्षे वयोगटातील 100 बालकांचा मृत्यू झाला. यामध्ये 50 मुले आणि 50 मुलींचा समावेश आहे.
याशिवाय, 134 मृत बालके (स्टिल बर्थ) जन्माला आल्याचे निदर्शनास आले आहे. गर्भवती स्त्रीने स्वत:चे आणि बाळाचे पोषण व्यवस्थित होईल, याची काळजी घ्यावी, नवजात बालकांना सात आजारांविरुध्द देण्याच्या लसी चुकवू नयेत, दोन प्रसुतींमध्ये पुरेसे अंतर असावे,
मातेचे आणि बाळाचे आरोग्य जपले जावे, घरी प्रसुती करु नये, गर्भधारणेआधी, दरम्यान आणि प्रसुतीनंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करावेत, या मार्गदर्शक तत्वांचे पालन केल्यास बालमृत्यू रोखता येऊ शकतात, असे बालरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.