पुण्यात आज पावसाचा अंदाज

Photo of author

By Sandhya

पुण्यात आज पावसाचा अंदाज

पुणे : आज पुन्हा शहराला यलो अलर्ट देण्यात आला असून, सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

शहरात गुरुवारी गारपीट झाली त्यामुळे तापमानात किंचित घट झाली, मात्र शुक्रवारी पुन्हा खंड पडल्याने तापमान एक अंशाने वाढले. वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. आगामी पाचही दिवस शहरात पावसाचा अंदाज आहे.

Leave a Comment