पुण्यात दहशतवाद्यांनी साखळी बॉम्बस्फोट किंवा मोठा घातपात घडविण्याचा रचला होता कट ?

Photo of author

By Sandhya

दहशतवाद्यांनी साखळी बॉम्बस्फोट घडविण्याचा रचला होता कट ?

पुण्यात साखळी बॉम्बस्फोट किंवा मोठा घातपात घडवून आणण्याचा दहशतवाद्यांनी कट रचला होता‌. याबाबत दहशतवाद्यांना सिरीयामधून सूचना मिळत होत्या, अशी खळबळजनक माहिती तपासात समोर आली आहे.  

मिळलेल्या माहितीनुसार, पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने नुकत्याच पकडलेल्या दहशतवाद्याकडून तपासात ही माहिती  मिळाली आहे.

दरम्यान, महम्मद शाहनवाझ आलमला एनआयएने नुकतीच अटक केली आहे. त्याला केव्हा आणि कुठल्या जागेवरून अटक केली, ही माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे.

पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात यापूर्वी अटक केलेल्या इतर आरोपींशी शाहनवाझ आलमचा डायरेक्ट कनेक्शन होते. आलमने साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी विविध ठिकाणांचा शोधही घेतला होता.

तत्पूर्वी, 18 जुलै रोजी कोथरूड पोलिसांनी महम्मद इम्रान खान व महम्मद युनूस साकी या दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए) व दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) आयसिसशी संबंध व दहशतवाद्यांना आश्रय(टेरर फंडिंग) दिल्याप्रकरणी दोघांना कोंढवा परिसरातून अटक केली होती.

Leave a Comment