पुरंदर | गुणवत्ता संवर्धन अभियानांतर्गत जिल्हास्तरीय पथकाकडून पुरंदर तालुक्यातील शाळांची तपासणी

Photo of author

By Sandhya


जिल्हा परिषद शिक्षण विभाग तसेच पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान पुणे जिल्ह्यात राबविण्यात येत आहे,या अभियाना अंतर्गत पुरंदर तालुक्यातील प्रथम तीन क्रमांकात प्रथम आलेल्या जिजामाता हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जेजुरी,हुतात्मा नाईक विद्यालय भिवडी व शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल सासवड या शाळांची आज जिल्हास्तरीय शालेय तपासणी श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेचे सहसचिव माजी शिक्षणाधिकारी दत्तात्रय गवळी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे प्रवक्ते तसेच पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रसाद गायकवाड, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या मुख्याध्यापक वार्तापत्राचे सहसंपादक विनायक सुंभे, दौंड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष रामचंद्र नातू , श्री सिद्धेश्वर विद्यालय पिंपळगावचे मुख्याध्यापक उत्तम जावळे, श्री. सद्गुरु माध्यमिक विद्यालय देऊळगाव गाडाचे सहशिक्षक महादेव कुदळे यांनी तसेच श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेच्या वतीने संस्थांतर्गत वार्षिक शालेय तपासणी पथक प्रमुख न्यू.इंग्लिश स्कूल जवळार्जुनचे प्राचार्य उत्तमराव निगडे, रिसेपिसे माध्यमिक विद्यालय रिसेचे मुख्याध्यापक विजय काकडे, रिसे पिसे माध्यमिक विद्यालयाचे सहशिक्षक जाधव एस.आर, गुरुकुल विद्यालय सासवड या विद्यालयाच्या सहशिक्षिका विद्या कारंडे यांनी यांनी केली.
आलेल्या टिमचे स्वागत महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव, विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांनी केले.
यावेळी संस्थेचे सहसचिव दत्तात्रय गवळी यांनी शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय चंदुकाका जगताप यांच्या विषयी माहिती सांगून विविध उपक्रम कसे राबवावे या विषयी माहिती सांगितली.
सूत्रसंचालन वर्षा देसाई व सागर चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमाचे नियोजन पर्यवेक्षक सतिश पिसाळ, लीना पायगुडे,शाळा समन्वयक प्रल्हाद गिरमे,माध्यमिक विभाग प्रमुख बाळासाहेब जगताप,सोमनाथ उबाळे,सोनबा दुर्गाडे, पोपट राणे, अजय जगताप,राजेंद्र ताम्हाणे ,पूनम उबाळे ,गणेश भंडलकर,मयूर शिंदे यांनी केले.

Leave a Comment