शिवरी : येथे नियोजित पत्रकार भवन बांधकाम स्थळी पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने ६ जानेवारी मराठी पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या वतीने तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. तर यावेळी पत्रकार भवन बांधकामातील पीसीसी कामाचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे पौराहित्य संतोष जंगम यांनी केले.
यावेळी उद्योजक दिपक साखरे, डॉ. प्रवीण जगताप, उद्योजक दिनेश भिंताडे, स्व. एकनाथ काका प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप, दिपक जांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष बळीराम सोनवणे, आप्पा भांडवलकर, नारायण शिवरकर, प्रमोद इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुरंदर तालुका पत्रकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
पत्रकार भवन बांधकामाचा उपक्रम हा अतिशय स्तुत्य असून यामध्ये होणारी वेगवेगळे दालने हे निश्चितपणे समाजासाठी दिशादर्शक तर आगामी काळामध्ये होऊ घातलेल्या नवीन पत्रकारांसाठी ही प्रेरणादायी ठरणारे असल्याने असल्याचे सांगत पत्रकारांनी पत्रकारिता समाजकार्य करत असताना मोठी धावपळ करावी लागत आहे अशा वेळी आपल्या कुटुंबाची आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी व यासाठी आवश्यक त्याप्रमाणे तपासणी शिबिरांचेही आयोजन करण्यासाठी आम्ही सहकार्य करू असे डॉ. प्रवीण जगताप, सुनिल धिवार व उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
संकल्प स्वप्नपूर्तीचा या माध्यमातून पत्रकार भवन इमारत बांधकामास दोन वर्षापासून सुरुवात झाली असून पायाचे काम जवळपास वीस ते पंचवीस फूट खोल जाऊन अतिशय मजबूत पद्धतीने करून आता पीसीसी पर्यंत सुमारे ७० ते ८० लाख रुपये खर्च करून हे काम पूर्ण होत आहे याचा मनस्वी आनंद होत असून स्वच्छ हेतू व निर्मळ भावनेतून नागरिकांच्या पर्यंत एका चांगल्या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही पोहोचत असून पत्रकार भवन संकल्पना व यातील विविध दालनांची माहिती नागरिकांना दिल्यानंतर अपेक्षेपेक्षाही जास्त मदत नागरिक करत आहेत. यामुळे लवकरच येत्या दोन वर्षांमध्ये सुमारे चार कोट रुपये खर्च करून ही स्वप्नवत इमारत पूर्ण होईल असा आशावाद जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर व तालुकाध्यक्ष योगेश कामथे यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल जगताप यांनी केले तर आभार राजेंद्र शिंदे यांनी मानले.