नीट परिक्षेतील घोटाळ्यावरून सातत्याने नवे खुलासे होत आहेत. NEET UG पेपर लीक प्रकरणातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा आहे. पाटणा येथील NHAI गेस्ट हाऊसमध्ये अनेक उमेदवारांना NEET UG परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आधीच मिळाल्या होत्या आणि त्यांनी रात्रभर उत्तरे पाठांतर केली.
NEET परीक्षा में 24 लाख से अधिक छात्रों के भविष्य के साथ हुए खिलवाड़ पर भी नरेंद्र मोदी हमेशा की तरह मौन धारण किए हुए हैं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 18, 2024
बिहार, गुजरात और हरियाणा में हुई गिरफ्तारियों से साफ है कि परीक्षा में योजनाबद्ध तरीके से संगठित भ्रष्टाचार हुआ है और ये भाजपा शासित राज्य पेपर लीक का…
पाटणा विमानतळासमोरील NHAI गेस्ट हाऊसच्या खोली क्रमांक 404 मध्ये अनेक विद्यार्थ्यांना थांबवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर पुन्हा एकदा कॉंग्रेस क्षाचे नेते राहुल गांधी यांनीही केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावर मौन धारण केले असून भारतीय जनता पार्टीची सरकारे असलेली राज्ये पेपरफुटीची केंद्रे झाली आहेत अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
राहुल गांधी म्हणाले की, “NEET परीक्षेतील २४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याच्या मुद्द्यावर नरेंद्र मोदी नेहमीप्रमाणेच मौन बाळगून आहेत. बिहार, गुजरात आणि हरियाणामधील अटकेवरून स्पष्टपणे दिसून येते की परीक्षेत पद्धतशीरपणे संघटित भ्रष्टाचार होत आहे आणि ही भाजप शासित राज्ये पेपरफुटीचे केंद्र बनले आहेत.”
पुढे ते म्हणाले, “आमच्या न्यायालयीन दस्तऐवजात आम्ही पेपरफुटीविरोधात कडक कायदा करून तरुणांचे भविष्य सुरक्षित करण्याची हमी दिली होती. देशभरातील तरुणांचा आवाज रस्त्यावरून संसदेपर्यंत जोरदारपणे बुलंद करून आणि सरकारवर दबाव टाकून अशी कठोर धोरणे आखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.