राहुल गांधी दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर…

Photo of author

By Sandhya

राहुल गांधी

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान कसबा बावडा येथील भगवा चौकात त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे.

संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते व आमदार सतेज पाटील यांनी दिली. 4 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते होईल.

कसबा बावड पॅव्हेलियन मैदानावर 2001 कलाकार नाटय सादर करणार आहेत, यामध्ये 1 हजार कलाकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत दिसणार आहेत.

राहुल गांधी 5 ऑक्टोबर रोजी सकाळीराजर्षी शाहू समाधी स्थळाला भेट देऊन अभिवादन करतील. त्यानंतर संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात १ हजाराहून अधिक निमंत्रित सहभागी होणार आहेत.

यामध्ये सर्व धर्मीय लोक तसेच विविध NGO च्या प्रतिनिधींचा सहभाग आहे. राहुल गांधी या सर्वांशी संवाद साधणार आहेत. ४ ऑक्टोबर कोल्हापूर दौरा – ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. – कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी कार्यक्रम स्थळी प्रस्थान करतील.

– कसबा बावडा येथील समारंभ संपल्यानंतर हॉटेल सयाजीकडे प्रयाण आणि मुक्काम करतील. ५ ऑक्टोबर कोल्हापूर दौरा – ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता हॉटेल सयाजी येथून राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाकडे प्रस्थान करतील.

– दुपारी १.३० वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ येथे आगमन व अभिवादन, त्यानंतर संविधान सन्मान संमेलन कार्यक्रमास उपस्थिती राहतील. – सायंकाळी ४ वाजता हॉटेल सयाजी येथून कोल्हापूर विमानतळकडे प्रयाण असा त्यांचा दौरा कार्यक्रम असेल. 

Leave a Comment

You cannot copy content of this page