छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने नारायणगावात राजे प्रतिष्ठानने विवो च्या कार्यालयावर काढला मोर्चा

Photo of author

By Sandhya


छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून कॅलेंडर छापल्यामुळे नारायणगावचे सरपंच बाबू पाटे व राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या शेकडो कार्यकर्त्यांनी विवो या मोबाईलच्या कार्यालयावर मोर्चा काढून त्यांना समज दिली.यावेळी बोलताना बाबू पाटे म्हणाले,
छत्रपती शिवरायांचा जन्म शिवजन्मभूमी आमच्या किल्ले शिवनेरी जुन्नर येथे १९ फेब्रुवारी ई.स.१६३० रोजी झाला.तमाम हिंदू धर्माचे आराध्य दैवत, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे १९ फेब्रुवारी जयंतीचे मोबाईल Vivo आणि OPPO कंपनीचे कॅलेंडर App मध्ये शिवाजी जयंती असा एकेरी उल्लेख केलेला आहे. मोबाईल App मधील कॅलेंडरवरील महाराजांची १९ फेब्रुवारी जयंतीचे एकेरी असलेले नावाचा उल्लेख काढून राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती असा उल्लेख करावा दोन दिवसात असे झाले नाही तर नारायणगाव आणि परिसरातील या कंपन्याचे कार्यालय व दुकाने उघडून देणार नाही. असे पत्र व वरिष्ठ कार्यालयासोबत दूरध्वनीद्वारे समज दिली.
यावेळी बाबू पाटे, संतोष वाजगे, आरिफभाई आतार, नंदू अडसरे, हेमंत कोल्हे,समीर इनामदार, ईश्वर पाटे,जालिंदर खैरे, पप्पू भूमकर, गणेश पाटे,व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Comment

You cannot copy content of this page