राजगुरुनगर | एस. टी. प्रवासातील दर वाढी विरोधात खेड तालुका उध्दव ठाकरे शिवसेना वतीने राजगुरुनगर येथे चक्का जाम आंदोलन

Photo of author

By Sandhya


राजगुरुनगर : तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांचे नेतृत्व खाली झालेल्या आंदोलनात यावेळी जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, तालुकाप्रमुख रामदास धनवटे, महिला जिल्हा संघटक विजयाताई शिंदे, माजी तालुका प्रमुख सुरेश चव्हाण, महिला आघाडी तालुकाप्रमुख उर्मिला सांडभोर ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब ताये, युवा सेनेचे मृण्मय काळे, बी के कदम, शहर प्रमुख संतोष उर्फ पप्पु राक्षे, , सुदाम कराळे, किरण गवारे,यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक नागरिक जेष्ठ महिला उपस्थित होत्या.
एसटी प्रवासातील सुमारे १५ टक्के दरवाढ शासनाने मागे घ्यावी सर्वसामान्य माणसांचा एसटीचा प्रवास सुखकर करावा.अशी मागणी खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी केली. यावेळी विजया शिंदे, रामदास धनवटे,अशोक खांडेभराड यांनी मनोगत व्यतक केले. मागण्यांचे निवेदन खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे याना देण्यात आले. दरम्यान वाहतूक कोंडी झाली. चक्का जॅम मुळे प्रवाशाना काही काळ वाहनामध्ये अडकून पडावे लागले. आंदोलनानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. 

Leave a Comment

You cannot copy content of this page