रामदास आठवले यांच्या पार्टी कडून सीमा हैदरला निवडणूक लढवण्याची ऑफर

Photo of author

By Sandhya

रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून सीमा हैदरला निवडणूक लढवण्याची ऑफर

‘पब्‍जी’ प्रियकरासाठी चार मुलांसह पाकिस्तानमधून अवैधरित्‍या भारतात आलेली सीमा हैदर सध्‍या चर्चेचा विषय ठरली आहे. सध्‍या ती प्रियकर सचिन मीनासोबत नोएडा येथे राहत आहे.

ती पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा आरोपही झाला होता. आता सीमा हैदर आगामी लोकसभा निवडणुकीत खासदारकीची निवडणूक लढवू शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘एनडीए’चा मित्रपक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून सीमा हैदरला निवडणूक लढवण्याची ऑफर देण्‍यात आली आहे. तिने ही ऑफर स्वीकारली आहे.

Leave a Comment