राज्यातील आमदार अपात्रतेप्रकरणी संविधान घटनेतील तरतुदीनुसार विधिमंडळ, न्यायपालिका, कार्यपालिका यांच्या अधीन राहून तसेच पक्षातंर बंदीच्या कायद्याचे उल्लंघन झाले की नाही या बाबी पडताळून योग्य अभ्यास करून मगच यावर निर्णय घेण्यात येईल,
अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत दिली. तसेच आता सत्तेवर आलेले सरकार संविधानाच्या चौकटीत बसून निर्माण झाल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
मातोंड येथे कुलदेवतेच्या दर्शनासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सावंतवाडीत आले असता त्यांनी सालईवाडा येथील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला.
कायदा मोडणार्यावर कारवाई आमदार अपात्रतेप्रकरणी तिन्ही न्यायपालिकांचा अभ्यास करून सर्व बाबी पडताळून लवकरच निर्णय देण्यात येईल.
जो कोणी कायदा मोडेल असे सिद्ध झाल्यास त्यावर उचित कारवाई केली जाईल, असा टोला आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता नार्वेकर यांनी लगावला.