राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शरद पवार देखील रुग्णालयात पोहोचले आहेत.
याबाबत एएनआय या वृतसंस्थेने ट्विट करत माहिती दिली आहे. प्रतिभा पवार यांच्या शस्त्रक्रियेबाबत पवार कुटुंबियाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.